ग्रामीण जनतेवरील प्रत्येक अन्यायाविरुद्ध आम्ही संघर्षासाठी सज्ज आहोत. आमची आंदोलने केवळ संघर्ष नाहीत, तर ती न्यायाची नवी पहाट आहेत.
इसार कुरैशी यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो तरुणांना उज्ज्वल भविष्यासाठी यशाची दिशा दाखवणारे विशेष सत्र संपन्न झाले.
यश: ग्रामीण तरुणांना करिअरच्या नवनवीन संधींची माहिती मिळाली.
बँक ऑफ इंडिया पोलादपूर येथील अमराठी अधिकाऱ्यांना मराठीतच बोलण्याची तंबी संस्थापक श्री राज दादा पार्टे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आली. तसेच, घरी आजारपणामुळे बँकेत येऊ न शकणाऱ्या पेन्शनधारकांची होत असलेली कुचंबणा लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी स्वतः गावोगावी जाऊन सर्वे करून त्यांना घरपोच पेन्शन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली.
यश: अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावी जाऊन सर्वे सुरू केला आणि पेन्शन वितरणाचा मार्ग मोकळा झाला.
पोलादपूर विद्यामंदिर शाळेचे हजारो विद्यार्थी व पालकांसह महामार्गावरील पुलाच्या कामासाठी भव्य आंदोलन छेडण्यात आले.
यश: पुलाचे काम तातडीने सुरू करण्याबाबत प्रशासनाला दिलेला इशारा.
हक्काच्या घरांपासून वंचित असलेल्या दरडग्रस्तांच्या प्रश्नासाठी संस्थापक राज पार्टे यांनी तहसील कार्यालयात आक्रमक पवित्रा घेतला.
स्थिती: घरांच्या मागणीसाठी सरकार दरबारी तीव्र संघर्ष सुरू.
वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत नवीन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशित करून सामाजिक बांधिलकीचा जागर केला.
यश: संस्कृती आणि सामाजिक कार्याची माहिती घराघरांत पोहोचवली.
महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांनी वीजबिल भरण्याच्या बहाण्याने नागरिकांकडून रोख स्वरूपात पैसे घेऊन फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली. "आपली माती आपली माणसं" संस्थेने तत्काळ लक्ष घालून संबंधित व्यक्तीकडून नागरिकांचे पैसे वसूल केले व थेट महावितरण अधिकाऱ्यांकडे जमा केले. तसेच, अवाढव्य बिल येणाऱ्या स्मार्ट मीटरविरोधात ग्रामपंचायतींचा ठराव मिळवून देण्याची मोहीम यशस्वीपणे हाती घेतली आहे.
यश: नागरिकांची आर्थिक फसवणूक थांबली आणि भविष्यातील व्याजाचा भार टाळण्यात यश आले.
आंबेनळी घाटातून एसटी बस सेवा बंद असल्याने खाजगी टॅक्सी चालक प्रवाशांकडून अवाढव्य रक्कम आकारत होते. प्रवाशांची ही लूट थांबवण्यासाठी संस्थेने महाड एसटी आगार प्रमुख यांची भेट घेऊन बस सेवा सुरू करण्याचे निवेदन दिले. रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी या निवेदनाची दखल घेऊन २३ ऑगस्ट २०२५ रोजी घाट सेवा पूर्ववत करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.
यश: घाटातील बस सेवा पुन्हा सुरू झाली आणि प्रवाशांची लूट थांबली.
खराब वीज मीटर, अव्वाच्या सव्वा येणारी वीजबिले आणि उघड्या डीपी पेट्या या समस्यांकडे महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी संस्थेने 'रेड्यांच्या झोंब्या' या पारंपारिक खेळाच्या माध्यमातून तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला. झोपलेल्या प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्यासाठी हा अनोखा निषेध मार्ग निवडण्यात आला.
यश: आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे महावितरण प्रशासनाने तातडीने प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण जनतेचे हाल होत होते. आरोग्य सुविधांचा अभाव आणि डॉक्टरांची कमतरता यावर तोडगा काढण्यासाठी ११ जुलै २०२५ रोजी "आपली माती आपली माणसं" सामाजिक संघटनेने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयावर धडक मोर्चा काढला. प्रशासनाला जागे करून आरोग्य सेवेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी या माध्यमातून करण्यात आली.
यश: रिक्त पदे भरण्याचे आणि औषधांचा तुटवडा दूर करण्याचे प्रशासनाचे आश्वासन.
गौरी-गणपती सणापूर्वी पोलादपूर तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले गवत, झाडांच्या फांद्या आणि चिखलामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले. प्रवाशांना व शहरातून येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी तातडीने रस्ते दुरुस्ती आणि साफसफाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.
यश: सणापूर्वी रस्त्यांची स्वच्छता मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे हाती घेण्यात आली.
पोलादपूर तालुक्यातील केवणाळे व साखर सुतारवाडी येथील दरडग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी संस्थेने कंबर कसली आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर हक्काच्या घरांपासून वंचित असलेल्या या नागरिकांच्या सुरक्षित निवाऱ्यासाठी आणि कायमस्वरूपी घरांच्या बांधकामासाठी सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे.
स्थिती: पुनर्वसनासाठी जागा निश्चिती आणि निधी मंजुरीचा लढा अविरत सुरू.
सामाजिक बांधिलकी जपत आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेच्या वतीने सन्माननीय अध्यक्ष श्री. निलेश कोळसकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पितळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यश: परिसरातील कचरा संकलन, साफसफाई, झाडलोट आदी कामे करण्यात आली.
समाधी स्थळाचे स्वच्छता व जतन हे आपलं सामाजिक आणि सांस्कृतिक कर्तव्य आहे, ही जाणीव ठेवून आम्ही हे पावित्र्य स्थान स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला आहे. ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न संघटनेतर्फे सातत्याने केला जात आहे.
स्थिती: ऐतिहासिक वारसा जतन आणि नियमित स्वच्छतेसाठी चळवळ कार्यरत.
जनतेच्या मूलभूत समस्या? त्याकडे कोणाचंही नाही लक्ष्य! या बेफिकीर प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी संघटनेतर्फे हे 'भिक मागो आंदोलन' छेडण्यात आले. जनतेच्या प्रश्नांवर राजकारण करणाऱ्यांना चपराक देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
उद्देश: राज्यकर्त्यांना जनतेच्या हालाखीच्या परिस्थितीची जाणीव करून देणे.
साखर सुतारवाडी व केवनाळे येथील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकारने मंजूर केलेली ₹२,३०,००० आणि विविध कंपन्यांकडून मिळणारी ₹१५ लाख इतकी अतिरिक्त मदत आता कोणत्याही ठेकेदाराशिवाय थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ग्रामस्थ स्वतः आपल्या घराचे बांधकाम करू शकतील, ही महत्त्वाची मागणी पुनर्वसन मंत्री आणि खासदारांनी मान्य केली आहे.
यश: संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित; लाभार्थ्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार मिळाला.
विद्यार्थ्यांना वह्या, हेल्मेट आणि रोपांचे वाटप करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
यश: शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळाला.
ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने साखर येथील समाधी स्थळ परिसरात स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यात आली.
यश: ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी संस्थेचा पुढाकार.
संस्थेच्या आगामी सामाजिक उपक्रमांची आखणी करण्यासाठी आणि ग्रामीण प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.
यश: सामाजिक कार्याला नवीन दिशा देण्यासाठी एकमत झाले.
सामाजिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल पोलादपूर तहसीलदार कार्यालयातर्फे संस्थेला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यश: संस्थेच्या सातत्यपूर्ण कार्याला शासकीय पावती मिळाली.
वीजबिलाच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून संस्थेने पैसे वसूल करून महावितरणकडे जमा केले आणि नागरिकांचे नुकसान टाळले.
यश: भ्रष्टाचार उघड करून सामान्यांचे कष्टाचे पैसे वाचवले.
प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे आणि मोरणकर महाराज यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
यश: ग्रामीण प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एक हक्काचे केंद्र उपलब्ध झाले.
बालाजी हॉटेल लॉन येथे आयोजित व्याख्यानाद्वारे तरुणांमध्ये आणि नागरिकांमध्ये सामाजिक कार्याची ओढ निर्माण करण्यात आली.
यश: विचारांच्या प्रबोधनातून समाज परिवर्तनाचे पाऊल उचलले.
अपघात रोखण्यासाठी महामार्गावरील दुर्घटनाग्रस्त ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी संस्थेने पुढाकार घेतला.
यश: प्रवाशांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा.
स्वस्त धान्य दुकानातील अनियमितता आणि दादागिरीविरोधात तहसीलदारांना निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी केली.
यश: प्रशासनाला रेशनिंग वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आदेश देण्यास भाग पाडले.
कापडे येथे वारीला जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर यशस्वीरीत्या राबवले.
यश: शेकडो वारकरी बांधवांना आरोग्य सुविधेचा लाभ मिळाला.
वारीच्या प्रवासात वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून कापडे येथे हा सेवाभावी उपक्रम राबवण्यात आला.
यश: ५००० भाविकांना शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.
शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात विनामूल्य मदत सेवा सुरू केली.
यश: अनेक महिलांना तांत्रिक अडचणींमधून बाहेर काढून अर्ज भरण्यास मदत केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सहकार्याने नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि लाचेविरुद्धच्या कायद्यांची माहिती देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित केले.
यश: भ्रष्टाचाराविरुद्ध नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली.
राज पार्टे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्यासाठी भव्य वृक्षारोपण मोहीम राबवली.
यश: ७ वर्षांपासून सातत्यपूर्ण पर्यावरण रक्षण मोहीम यशस्वी.
बाहेरच्या कंपन्यांकडून कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मनसे कामगार सेनेचा व्यवस्थापनाला आक्रमक इशारा.
यश: व्यवस्थापनाला कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यास भाग पाडले.
पोलादपूर तालुक्यात वाढीव आलेले बिल कमी करण्यास, खराब झालेले मिटर, व सडलेले पोल, 440 व्होलटच्या उघड्या दरवाजा नसलेल्या कॅबिन बदली करण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरु झाली..
यश: ४ दिवसांत नवीन वीज खांब बसवून भीती दूर केली.
पुढारी केवळ राजकीय बॅनर लावत असताना संस्थेने आवाज उठवला. आपल्या सातत्यपूर्ण रेट्यामुळे अखेर कापडे ग्रामपंचायत कडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुसज्ज बस स्टॉप बांधण्यात आला.
यश: लोकशक्तीचा विजय आणि विद्यार्थ्यांची ऊन-पावसापासून सोय.
पीडित कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी २० लाख रुपयांच्या मदतीची लोकचळवळ उभी केली.
यश: सामाजिक मदतीचा ओघ सुरू करून कुटुंबाला आधार दिला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दर्जेदार शैक्षणिक साहित्य आणि सकस आहार मिळवून देण्याचे कार्य अविरत सुरू.
यश: शेकडो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि शिक्षणाची गोडी.
संस्थापक राज पार्टे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी संतांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला.
यश: सामाजिक कार्याला धर्माभिमानी संतांचे आशीर्वाद मिळाले.
पर्यावरण रक्षण आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत वृक्षारोपण आणि साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले.
यश: विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय आणि परिसराचे सौंदर्यीकरण.
थेट रणमैदानावरील काही खास क्षण
वर्षांचा संघर्ष
यशस्वी आंदोलने
शेतकरी सहभागी
न्यायासाठी कटिबद्ध