मीडिया अपडेट्स

वृत्त विशेष आणि घडामोडी

आमच्या चळवळीची दखल घेणारी प्रसारमाध्यमे आणि सामान्यांच्या हक्कासाठी दिलेला लढा.

अवैध वाळू उपसा कारवाई
ठळक बातमी

अवैध वाळू उपशावर प्रशासनाचा सर्जिकल स्ट्राईक; 'आपली माती आपली माणसं' संघटनेच्या रेट्याला मोठे यश!

तालुक्यातील नद्यांचे संतुलन बिघडवणाऱ्या अवैध वाळू उपशाविरोधात संघटनेच्या पुढाकाराने तहसीलदार कपिल घोरपडे आणि पोलीस सहाय्यक निरीक्षक आनंद रावडे यांच्या उपस्थितीत निर्णायक बैठक पार पडली. "निसर्गाची हानी खपवून घेणार नाही" असा इशारा संस्थापक राज पार्टे यांनी दिला. या बैठकीत घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

पोलादपूर प्रतिनिधी • ४ एप्रिल २०२६

ताज्या घडामोडी

तोतया पत्रकार

१४ मार्च २०२६

तोतया पत्रकाराचा संघटनेने घेतला समाचार; अखेर मागितली जाहीर माफी.

स्वतःला पत्रकार म्हणून सांगून महिला भगिनींना धमकावणाऱ्या प्रदीप मेस्त्रीला शिवछत्रपती चौकात जाब विचारून अद्दल घडवली.

बँक आंदोलन

लोकमत • २८ डिसेंबर २०२५

बँक ऑफ इंडियात राज दादा पार्टे यांचा मराठीसाठी एल्गार; पेन्शनधारकांचा प्रश्न मार्गी!

अमराठी अधिकाऱ्यांना मराठीत बोलण्याची तंबी आणि पेन्शनधारकांसाठी घरपोच सेवा देण्याचे आश्वासन मिळवले.

आंबेनळी घाट

पुढारी • २३ ऑगस्ट २०२५

भिक मागो आंदोलन: जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष?

आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेनं “भिक मागो आंदोलन” सुरू केलं आहे. पुढारी राजकारणात व्यस्त असताना जनतेच्या मूलभूत समस्यांकडे मात्र कोणाचंही लक्ष नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.चे आदेश दिले आहेत.

साखर सुतारवाडी

महाराष्ट्र टाइम्स • १० ऑगस्ट २०२५

दरडग्रस्तांच्या हक्काच्या घरांसाठी साखर सुतारवाडीत एल्गार; कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी.

साखर सुतारवाडी व केवणाळे येथील आपत्तीग्रस्तांच्या कायमस्वरूपी निवाऱ्यासाठी संस्थेचा तीव्र संघर्ष सुरू.

PWD रस्ते

लोकमत • ०५ सप्टें २०२५

‘आपली माती आपली माणसं’ संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटनदन.

प्राध्यापक व व्याख्यानकार श्री. वसंत हंकारे आणि गुरूवर्य मोरणकर महाराज यांच्या हस्ते कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

दिनदर्शिका

सामना • ०१ जाने २०२६

२०२६ च्या दिनदर्शिकेचे बोरज येथे शानदार प्रकाशन; वारकरी संप्रदायाची उपस्थिती.

सामाजिक जनजागृती आणि संस्थेच्या कार्याची माहिती देणाऱ्या विशेष दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण.

स्वच्छता मोहीम

पुण्यनगरी • १५ जुलै २०२५

पोलादपूर बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम; 'सुंदर पोलादपूर'चा जागर.

समाजहितासाठी एक पाऊल उचलताना संस्थेच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण एसटी स्टँड परिसर चकाचक केला.

वीज खांब दुरुस्ती

कृषीवल • २४ डिसेंबर २०२४

क्षेत्रपाळ येथील धोकादायक वीज खांब बदलला; महावितरणला संघटनेचा दणका.

खजिनदार संतोष दादा रिंगे यांच्या माहितीनंतर राज पार्टे यांनी महावितरणला आदेश देऊन ४ दिवसांत नवीन पोल बसवला.

सत्कार सोहळा

नवराष्ट्र • ०३ सप्टेंबर २०२४

वारकरी संप्रदायाकडून राज पार्टे यांचा सत्कार; सामाजिक कार्याचा गौरव.

घाटकोपर येथे वारकरी संप्रदायातील सर्व धर्मगुरूंनी राज पार्टे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले.

स्वच्छता मोहीम

पुढारी • २३ जुलै २०२५

मोरझोत धबधबा येथे स्वच्छता मोहीम; पर्यटकांना स्वच्छतेचा संदेश.

राज पार्टे व नीलेश कोळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोरझोत परिसरात कचरा वेचून सार्वजनिक स्वच्छतेचा जागर केला.

आरोग्य शिबिर

पुण्यनगरी • नोव्हेंबर २०२५

वारकरी बांधवांसाठी मोफत आरोग्य शिबिर; राम वरदानी मंदिर परिसरात उदंड प्रतिसाद.

कार्तिकी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आणि औषधोपचार संस्थेतर्फे मोफत करण्यात आले.